Vasantgad - SOLO
वसंतगड
नमसकार दुर्गप्रमींनो माझ्या नव्या ब्लॉग मध्ये. माझ्या मागच्या ब्लॉग ला मिळालेला प्रतिसाद बघून हा पुढचा ब्लॉग तत्परतेने हाती घेतला,
सर्वप्रथम सांगू इच्छितॊ कि यातील ऐतिहासिक माहिती मी नेटवरून किंवा मी वाचलेल्या पुस्तकातून गोळा केलेली आहे. सर्व इतिहास स्वतःला गोळा करता येत नाही. गुगल मॅप्स असल्याने मी येथे पोचायचे कसे वगैरे लहून लेख वाढवला नाही. दुसरे म्हणजे बारीक सारीक तपशील दिला नाही जसे कि डावीकडे वेळा थोडे वर जावा. सर्व प्रवास माझ्या गाडीने केला त्यामुळे ST च्या वेळा स्टॉप वगैरे यात आले नाही. असो.
ह्या डोंगररांगेतील किल्ले काहीप्रमाणात सारखे आहेत. सौम्य चढ़ ; व नंतर कडा ; कड्यात खोदलेल्या पायऱ्या. शिलाहार घराण्याचे बरेच उपकार महाराष्ट्रावर आहेत ते त्यांनी निर्माण केलेल्या किल्ल्यामुळे. त्यांनी बाराव्या शतकात बनवलेले किल्ले मराठेशाहीच्या अस्तापर्यंत कामास आले. या सर्व किल्यांवर शिवाजी महाराजानी मुकुट चढवला त्यामध्ये बरीच सुधारणा केली. वसंतगड अश्या काही भाग्यवान किल्ल्यामधील एक. हा किल्ला ट्रेकिंग च्या दृष्टीने सौम्य ह्या प्रकारात मोडतो. गड उत्तम पद्धतीने बघायचा असल्यास धावती भेट ती सुद्धा पुण्याला परत जाताना देऊ नये. कमीत कमी अर्धा दिवस द्यावा.
हाच तो माळावरचा मारुती. प्रत्येक गडकिल्ल्यवर अशी काहीं स्थाने आहेत ज्यामुळे गडावर राबता टिकून आहे. यात्रा होतात, लोकं जमतात आणि उदबत्ती दिवा लावला जातो.
मारुतीचे दर्शन घेतल्यावर हा एक होतकरू भेटला, त्याने गडाची बरीच माहिती दिली. त्याने दिलेल्या माहती प्रमाणे आत्ता आत्ता पर्यंत प्रवेश दारावरच्या बाजूच्या बुरुजावर एक तोफ होती. काही नतद्रष्टानी ती खाली ढकलून दिली आणि नंतर काय झालं कुणालाच पत्ता नाही.
हा गड त्यावरील चांद्रसेनाच्या मंदिर पद्दल सुद्धा प्रसिद्ध आहे. मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि पुजाऱ्याशी गप्पा मारत बसलो. त्याने सुद्धा गडाची बरीच माहिती दिली, मंदिर बऱ्यापैकी मोठे आहे, तेथे वस्तीला १५ जण सहज राहू शकतात. गडावर अजून बरीच मंदिरं आहेत.
पुजाऱ्याबरोबर मारलेल्या गप्पानंतर मला नेहमी प्रमाणे गड फेरीचे वेध लागले, बुरुजावरून हिंडत आजूबाजूच्या परिसराची निरीक्षणे घेत घेत मी पुढे जात होतो. गडफेरीला साधारण एक तास पुरेसा आहे,
दक्षिण दिशेला अजून एक प्रवेशदार आहे, सातारच्या दिशेला. पुणे मुंबई महामार्ग झाल्यापाससून राबता तळबीड गावातून वाढला असावा. त्याआधी हे मागचे प्रवेश द्वार जास्त प्रचलित असावे. हा दरवाजा बऱ्यापैकी सुस्थितीत आहे.
इंटरनेट वर गोळा केलेल्या माहिती नुसार १२ व्या शतकात शिलाहार घराण्यातील राजा दुसरा भोज याने या किल्ल्याची निर्मिती केली ती मुख्यतः कोकणात उतरणाऱ्या वाटांवर लक्ष ठेवण्याकरता. अंदाजे १६५९ च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी गड स्वराज्यात सामील करून घेतला. राजाराम महाराजांचे जिंजीहून परत आल्यावर या किल्ल्यावर वास्तव्य होते. मराठे शाहीच्या अस्तानंतर सन १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. असे म्हणता येईल कि असे किल्ले इंग्रजांच्या ताब्यात गेल्याने मराठे शाही चा अस्त झाला.
गडावर संवर्धन करण्या करता बरीच कामे आहेत. उगीच fort is in ruins म्हणण्यात काहीच अर्थ नाही. बरेचशे गडप्रेमी हि कामे करत असतीलच. मला सुचलेली काही कामे खालील प्रमाणे आहेत,
१. गडावरची वाढलेली झुडपे काढून टाकणे.
२. बुरुजावर वाढलेल्या व माजलेल्या मुळ्या इजा ना होता काढून टाकणे. गडफेरी करता आणि आतील इतर स्थानावर जाण्याकरता वाटा बनवणे.
३. पाणीसाठ्यात गाळ काढून टाकणे.
४. रात्रीच्या निवाऱ्या करता योग्य जागा राखणे.
होय, मला बोलावणे आल्यास मी सुद्धा सामील होईन. पुढाकार गावातील लोकांनी घ्यावा. मध्यंतरी वाचनात आले कि काही शिवप्रेमींनी येथे संवर्धनाचे काम केले आहे. एकदा जाईन बघायला.
पाहण्यासारखी आणिकही काही ठिकाणे खालीलप्रमाणे.
किल्ला पाहून परत उतरताना मला एक दुर्गप्रेमी भेटला. त्याने मला सदाशिव गडाला भेट द्यायला सुचवले. पुढच्या फेरीचे प्लॅन बनवतच मी खाली उतरलो.
लेखन मर्यादा
आपल्या अमूल्य वेळेकरता धन्यवाद.
संजय खाडे

