MY TREKKING
My Intro to Trekking
नाव: संजय भालचंद्र खाडे
वय : हा एक विषय आहे
शिक्षण : अजून पूर्ण झाले नाही, झालं कि सांगतो.
छंदाची सुरवात :२०१० पासून सिरिअसली
वय : हा एक विषय आहे
शिक्षण : अजून पूर्ण झाले नाही, झालं कि सांगतो.
छंदाची सुरवात :२०१० पासून सिरिअसली
लिहिण्यास सुरवात करण्याआधी – फोटो करता फेसबुक वर माझे मित्र व्हा (नसल्यास). YouTube वर माझ्या चॅनेल ला subscribe करा आणि हो मी Instagram वर पण आहे.
आणि हो हे प्रोमोशन नाहीये. शेअर करण्याचा एक प्रयत्न. 😀
माझा जन्म सातारला अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याला झाला. अजिंक्यताऱ्यावर मी अगणित वेळा गेलो आहे, आमच्या शेजारी मंगळाई देवी (जी अजिंक्यताऱ्याची देवी आहे) तिचे पुजारी राहायचे. त्यांना आम्ही गुरव म्हणायचो. छत्रपती भोसले यांच्या हत्तीखान्यात आमची शाळा होती. माझ्या आजीचे भाऊ छत्रपतींचे कारभारी होते. राजमाता सुमित्राराजे भोसले यांना नमस्कार करण्याचे भाग्य मला लाभले आहे. सातारला आमच्या दिवाणखान्यात बसल्यावर मंगळाई बुरजावरचा भगवा दिसतो. या सर्व वातावरणात मला किल्ले बघायची आवड लागली नसती तर नवलच. असो.
जश्या जश्या माझ्यावरच्या जबाबदार्या वाढत गेल्या तसे तसे हि आवड मागे पडत गेली. काम आणि शिक्षण ह्यामुळे बरीच वर्ष महाराष्ट्रापासून दूर होतो. आणि जसे ह्या जबाबदाऱ्या पूर्ण करत गेलो तसे ह्या मूळ स्वभावाने परत उचल खाल्ली. आणि २०१० पासून परत मी सिरीयस ट्रेकिंग ला सुरवात केली. काही नामांकित कंपन्यांमधून काम केल्यामुळे एक प्रकारची शिस्त लागली होती. त्याचा उपयोग मी खाजगी आयुष्यात पण करतो. जसे कि नॉटिंग ठेवणे; सवय लागण्याकरता रेकॉर्ड ठेवणे आणि XL मध्ये ट्रॅक करणे.
सर्वात संस्मरणीय ट्रेक – लिंगाणा
आत्तापर्यंत माझे ३६५ ट्रेक्स (किल्ले नव्हे) झाले आहेत. मला मलेशिया , ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका येथे ट्रेक करायच्या संधी मिळाल्या. करण्यासारखे अजून बरेच काही आहे म्हणून मी शक्यतो एक ट्रेक परत करणे ताळतो. (परंतु ह्याला राजगड, रायगड, आणिकही काही किल्ले अपवाद,) मला आलेले अनुभव मी नक्कीच शेअर करतो. मला मित्र जोडायला आवडतात. ट्रेकिंग मुले मी शेकडो मित्र जमवले. सर्व लोकांची नावे इथं घेता येणार नाहीत. एखाद्याचा अनुल्लेख महाग पडू शकतो. मला गप्पा मारायला आवडतात. लोकांना हसवायला आवडते, (लोक मला हसतात का माझ्या गोष्टींना ते मात्र माहित नाही). सुरवातीला ट्रेक वरील मित्र मला मित्रा म्हणायचे, नंतर दादा म्हणायला लागले. त्याची जागा काका ह्या नावाने घेतली. आणि लोकांनी आजोबा म्हणायच्या आत जेवढे फिरता येईल तेवढे फिरायचे आहे. यातील काका हा शब्द मला आवडत नाही.
माझ्या colleagues ची मुले माझे मित्र आहेत. त्यांच्या बरोबर माझे चांगले जमते. माझ्या मित्रांचे सरासरी वय ३० च्या आत असेल. (मी सुद्धा अजून तिशीत आहे ) सर्वाना मी सांगतो – बकेट लिस्ट बनवा.
ट्रेकिंग मुले माझे फायदेच फायदे झाले आहेत. (काही वांदे पण झाले, ते मात्र एखाद्या ट्रेकळाच ऐकवीन.)
१. मला फार चांगले मित्र मिळाले – त्येमध्ये cruz वरील चेफ, पट्टीचे फोटोग्राफर, लेखक, कॉम्पुटर एक्स्पर्ट, ड्रायव्हर्स, सापांना ओळखणारे, नक्षत्र आणि
तार्यांची माहिती असलेले आणि हो सायकलिस्ट सुद्धा. यातील बरेच जण माझ्यापेक्षा लहान असून माझे रोल मॉडेल आहेत.
२.सायकलिंग ची आवड लागली. नुकतीच मी मुंबई गोआ ट्रिप केली सोलो. ह्यावेळेस मला TV सिरीयल (महाराष्ट्राची हास्यजत्रा) चे कलाकार आणि लेखक मित्र
म्हणून लाभले. मालवण च्या अलीकडे आम्ही रस्त्यात गप्पा मारत बसलो होतो. सायकलिंग पण बरेच करायचं आहे.
३. फोटोग्राफी ची आवड निर्माण झाली.
४.आयडेंटिटी मिळाली, आधी मी नुसताच चिंधी माणूस होतो.
५, पोहायला शिकायचे आहे पण पाणी बघितलं कि माझ्या डोळ्यात पाणी येते,
६. ड्रायविंग आवडते. ट्रेकिंग आणि मित्राबरोबर हिंडायला मी होंडा सिटी काढून XUV घेतली.
७. बरेच ट्रेक organize केले, पण माझा कल इतरांना प्रोत्साहन देण्याकडे असतो आणि मला ते आवडते.
८. काही मित्रांमुळे मोटोरसायकलिंग ची आवड निर्माण झाली,
९. सध्या मी अमेरिकेत आहे. कोरोना चा गोंधळ संपल्यावर प्रिय भारतात येऊन full time मी आणि माझी बकेट लिस्ट.
१०. वाचनाची आवड वृद्धिंन्गत झाली. माझी पर्सनल लायब्ररी बऱ्यापैकी मोठी आहे.
असो फारच लिहीत आहे. क्षमस्व.
fb YouTube आणि इंस्टाग्राम विसरू नका मात्र,